CES 2026: मोटोरोलाचा नवा ‘Razr Fold’ लाँच; AI फीचर्स आणि मोठ्या डिस्प्लेने मारली बाजी!

लॅस वेगास येथे सुरू असलेल्या CES 2026 (Lenovo Tech World) मध्ये मोटोरोलाने आपला बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप फोन Motorola Razr Fold अधिकृतपणे लाँच केला आहे. जुन्या फ्लिप फोन्सच्या डिझाइनकडून आता कंपनीने पूर्णपणे हाय-एंड फ्लॅगशिप मॉडेलकडे आपला मोर्चा वळवला आहे.

CES 2026: मोटोरोलाचा नवा ‘Razr Fold’ लाँच; AI फीचर्स आणि मोठ्या डिस्प्लेने मारली बाजी!

काय आहेत खास वैशिष्ट्ये?

  • दोन मोठे डिस्प्ले: फोन बंद असताना बाहेरील बाजूला ६.६ इंचाची मोठी स्क्रीन मिळते, तर फोन उघडल्यावर आतमध्ये ८.१ इंचाचा विशाल २K LTPO स्क्रीन दिला आहे, जो मल्टीटास्किंगसाठी उत्तम आहे.
  • Motorola Qira AI: हा फोन मोटोरोलाच्या नव्या ‘Qira’ या AI प्लॅटफॉर्मवर चालतो. यामध्ये ‘Catch Me Up’ आणि ‘Next Move’ सारखे फीचर्स आहेत, जे युजरला ॲप न बदलता महत्त्वाचे रिमाइंडर्स आणि सूचना देतात.
  • दमदार कॅमेरा: यात ५०MP चे तीन रिअर कॅमेरे असून पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी अंतर्गत आणि बाह्य असे दोन स्वतंत्र कॅमेरे दिले आहेत. तसेच यात सोनीचा LYTIA सेन्सर आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्टही मिळतो.

थोडक्यात सांगायचे तर, मोटोरोलाने केवळ स्टाईलच नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि परफॉर्मन्सवरही यावेळी विशेष भर दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *